चालत्या गाडीला आग लागून गाडी जळून खाक, सुदैवाने जीवितहानी नाही

भंडारा : ६ मे – चालत्या गाडीला अचानक आग लागून गाडी जळून खाक झाली ची घटना तुमसर गोबरवाही मार्गावर घडली. आग लागताच गाडीतील प्रवाशांनी बाहेर उडी घेत स्वतःला जीव वाचवले नाही अनर्थ टळला. गोबरवाही येथील शिवप्रसाद डे हे तुमसर वरून स्वतःच्या मालकीच्या मारुती कारने गोबरवाही कडे येत होते.
गोबरवाही पासून दहा किलोमीटर अंतरावर असताना पवणारा गावाजवळ त्यांच्या गाडीने अचानक पेट घेतला. तांत्रिक कारणामुळे आग लागल्याचे लक्षात येताच गाडी मालक शिवप्रसाद व त्याच्या सहकाऱ्यांनी गाडीतून उड्या मारीत स्वतः चे जीव वाचविले. तुमसर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या पथकाने येऊन आग नियंत्रणात आणली. घटनेची नोंद तुमसर पोलिसात करण्यात आली आहे.

Leave a Reply