मोटारसायकलींच्या धडकेत डॉक्टरचा मृत्यू

वाशिम : ४ मे – वाशिम जिल्ह्यातील रिसोड -लोणार महामार्गावर दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे.
दुचाकीच्या भीषण अपघातात मोप आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शिवशंकर वरकड जागीच ठार झाले आहे. लोणारवरून डॉ. शिवशंकर वरकड हे एमएच २० इक्यू ७९६० या क्रमांकाच्या मोटारसायकलने मोप इथं जात होते. त्याच वेळेस रिसोड – लोणार महामार्गावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने रिसोड वरून येणाऱ्या गाडी क्रमांक एमएच ३८ यु ८१९२ या मोटारसायकल स्वाराने डॉ. शिवशंकर वरकड यांच्या गाडीला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात दोन्ही गाड्यांचा यात चुराडा झाला.
या भीषण अपघातामध्ये जबर मार लागल्यामुळे डॉ शिवशंकर वरकड जागीच ठार झाले. तर दुसरा मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे. गंभीर जखमी व्यक्तीला वाशिम इथं पाठविण्यात आलं आहे. अपघाताचा तपास रिसोड पोलीस करत आहेत.

Leave a Reply