नागपूर : ४ मे – नागपूरसह पूर्व विदर्भाला कोरोनाने थोडा दिलासा दिला आहे. गेल्या काही दिवसात बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ऍक्टिव्ह रुग्णांमध्ये घट झाल्याचे दिसून आले आहे त्यामुळेच आरोग्य यंत्रणेला काही अंशी दिलासा आहे. गेल्या २४ तासात पूर्व विदर्भात ७७०८ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून ११४४७ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. मृत्युसंख्या डोकेदुखी ठरत असतानाच गेल्या दोन दिवसांपासून मृत्युसंख्येतही काही अंशी घट झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या २४ तासात पूर्व विदर्भात १४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर नागपूर शहरात ४१८२ बाधित रुग्ण आढळले असून ७३४९ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तर ७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासात नागपुरात ४१८२ नवीन बाधित रुग्ण आढळले असून त्यात १६७४ ग्रामीण भागातील, २४९८ शहरातील तर १० रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. नागपुरातील एकूण रुग्णसंख्या ४२८५३९ वर पोहोचली आहे. आज नागपूर शहरात ७१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून त्यात २१ रुग्ण ग्रामीण भागातील, ४० शहरातील तर १० रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. तर शहराची एकूण मृत्युसंख्या ७७४६ वर पोहोचली आहे.
गेल्या २४ तासात नागपुरात १९४६८ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात ५६९६ ग्रामीण भागात तर १३७७२ शहरात चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आज ७३४९ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३५१५९४ वर पोहोचली आहे. आज बरे झालेल्या रुग्णांमध्ये २४३४ ग्रामीण भागातील तर ४९१५ शहरातील रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोना बरे होण्याचे प्रमाण ८२.०४ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या नागपुरात ६९१९९ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यात ३०३१५ ग्रामीण भागातील तर ३८८८४ शहरातील आहेत.