नवी दिल्ली : ३ मे – देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचे मोठे संकट निर्माण झाले आहे.
दररोज लाखांच्या संख्येत नवीन करोनाबाधित आढळून येत आहे.
तर, मृत्यू संख्येत मोठी भर पडत आहे.
परिणामी आरोग्य यंत्रणा कोलमडत आहे.
रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शन, लस आदींचा तुटवडा निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
यामुळे अनेक ठिकाणी रूग्णांचे मृत्यू होत असल्याच्या घटना देखील समोर आल्या आहेत.
एकूण रूग्णांचे मोठ्याप्रमाणवर हाल होताना दिसत आहे.
करोनाविरोधातील या लढाईत भारताल मदत करण्यासाठी जगभरातील अनेक देश पुढे आले आहेत.
तर, आता या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाने (एस.बी.आय.) करोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी ७१ कोटींची मदत जाहीर केली आहे.
देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एस.बी.आय.ने भारतला कोविड-19 च्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ७१ कोटी रुपयांची मदत केली आहे.
बँकेने १ हजार बेडच्या तात्पुरत्या स्वरूपातील रूग्णालयासाठी ३० कोटी रूपये दिले आहेत.
तसेच, करोनाचा प्रादुर्भाव अधिक असलेल्या राज्यांमध्ये २५० बेड आय.सी.यू.च्या सुविधेबरोबरच आणखी १ हजार आयसोलेशन सुविधा असलेल्या बेडसाठी देखील आर्थिक मदत केली आहे.
या सुविधा संबंधित शहारांमधील सरकारी रूग्णालयं आणि महानगरपालिकांच्या मदतीने निर्माण केल्या जातील.
असं बँकेकडून सांगण्यात आलं आहे.