घरात सापडला आई आणि मुलीचा कुजलेला मृतदेह

वर्धा : ३ मे – समुद्रपूर तालुक्यातील सावंगी (झाडे) येथे रविवारी कुजलेल्या अवस्थेत घरीच कोरोनाबाधित आई व मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. सुभद्रा डोमाजी मांडवकर (८0) व सुरेखा हरिश्चंद्र पाचखंडे (४५ ) असे मृतक आई, मुलीचे नावे आहेत.
मृतक आई व मुलगी कुटुंबीयापासून वेगळ्या राहत. मुलगी सुरेखा ही आजारी होती. काही दिवसांपूर्वी त्या हिंगणघाटवरून दवाखान्यातून आल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या बाहेर दिसल्या नाही. रविवारी ( ता. २ ) सकाळी मृतक महिलेची सूण जिजाबाई प्रकाश मांडवकर हिला दुर्गंध आली असता तिने मृतक महिलेच्या घरी जाऊन पाहिले असता दोघींचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळले. तिने घरील सदस्यांना व गावकर्यांना याविषयी सांगितले. उपसरपंच अजय कुडे व पोलिस पाटील समीर धोटे यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
सदर महिला शेतमजूरी करुन स्वत:चा उदरनिर्वाह करित होत्या. मुलगी सुरेखा सात -आठ वर्षापासून आजारी होती. त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना काळात आरोग्य कर्मचारी प्रत्येक गावात जाऊन तपासणी करते सोबतच आशा वर्कर प्रत्येक रुग्णावर लक्ष ठेवून असते. मात्र, या ठिकाणी कोणाचेही कसे लक्ष गेले नाही, असा प्रश्न विचारला जात आहे. पुढील तपास ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात धनंजय पांडे, अमोल पुरी करीत आहे.

Leave a Reply