स्वतः मधे काही करण्याचा
अजिबात दम नाही!
दुसरा कोणी करतो
त्याला करू देत नाही !
या स्वार्थलोलुप दळभद्र्यांना
खंडणीखोरी आणि सुडाशिवाय
दुसरं काहीच येत नाही !
सकारात्मता तर यांच्या
रक्तात सुद्धा नाही !
आणि असली रडतराऊत माणसं
आज लोकांच्या बोकांडी बसली !
सिंहासनावर कार्टुन पाहून
लोकशाहीही रडली !
कवी-- अनिल शेंडे।