वाघाच्या हत्येप्रकरणात दोन आरोपी अटकेत

यवतमाळ : १ मे – झरी तालुक्यातील मांगुर्डा वन क्षेत्रात चार वर्षीय वाघिणीची निर्दयतेनेे शिकार करून तिच्या पुढील पायाचे पंजे छाटून नेल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती. या घटनेने राज्यात खळबळ माजली होती. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांंना यश आले आहे.
या प्रकरणी आरोपी हुडकून काढण्यात वनविभागाला अपयश आल्याने पोलिस विभागाची मदत घेण्यात आली. पोलिस विभागाने या बाबतीत गोपनीय माहिती मिळवून शुक‘वार, 30 एप्रिल रोजी दुपारी 3 च्या दरम्यान वाघिणीच्या शिकारी प्रकरणी झरी तालुक्यातील पांढरवाणी येथील अशोक लेतू आत्राम (वय 25) व लेतू रामा आत्राम (वय 45) या दोन बापलेकांना त्यांचे पांढरवाणी येथून अटक करण्यात आली.
अशोकला पोलिसी हिसका दाखवताच त्याने वाघिणीच्या छाटलेल्या दोन पंजांमधील एक पोलिसांच्या स्वाधीन केला आहे. तर दुसर्या पंजाच्या शोधात पोलिस आरोपींना घेऊन घटनास्थळाकडे रवाना झाले असून पुढील तपास चालू आहे.

Leave a Reply