वर्धा : ३० एप्रिल – आष्टी येथील वनपरिक्षेत्रातील व आष्टी नियतक्षेत्रातील थार मार्गावरील वरील आडनाला या परिसरातील राष्ट्रीय पक्षी असलेले तब्बल चार/पाच मोर पक्षी मृत्युमुखी पडलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकाच खळबळ उडाली आहे. आष्टी येथील वन विभागाअंतर्गत येत असलेल्या आष्टी सहवनक्षेत्रातील नियतक्षेत्र आष्टीमधील थार मार्गावर आडनाल्याजवळ जंगली प्राण्यांना पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी वनविभाग मार्फत पाणवठे करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यातील थार-पार्डी रस्त्यावर असलेल्या थार जंगलात आड नाल्याजवळ पाण्यामध्ये विष प्रयोग करून सहा मोरांना मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वनविभागाने पंचनामा करून चौकशी सुरू केली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जंगलामध्ये पाण्याची व्यवस्था नाही. अशा परिस्थितीमध्ये शिकारी वन्यप्राण्यांना टार्गेट करीत आहे. याच हेतूने काही शिकार्यांनी आड नाल्यामध्ये वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी ठेवले. या पाण्यामध्ये विष प्रयोग केला. सदरचे पाणी मोर या प्राण्यांनी प्राशन केले आणि त्यातूनच एकापाठोपाठ सहा मोरांचा मृत्यू झाला.
सदरची घटना वनविभागाला माहिती होताच वनपरिक्षेत्राधिकारी सुहास पाटील व त्यांच्या अधिनस्त चमूने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मोरांचे शवविच्छेदन करण्यासाठी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली कांबळे यांना बोलविले. डॉक्टर कांबळे यांनी पंचनामा करून शवविच्छेदन केले असून काही अवयव प्रयोगशाळेमध्ये पाठवले आहे. प्रयोग शाळेमधून रिपोर्ट आल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. आष्टी जंगलामध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये वन्यप्राणी आहे. मात्र, शिकार्यांच्या पथ्यावर असल्याने एकापाठोपाठ असंख्य मोर, ससा, हरिण या प्राण्यांची शिकार होत असल्याच्या घटना अलीकडेच उघडकीस आले आहे. वनविभागाने वन्यप्राण्यांची शिकार करणार्या विरोधात तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे.