नागपूर : २९ एप्रिल – फेटरीतील लाइफस्कील्स पुर्नवसन केंद्रात उपचार घेत असलेल्या १६ वर्षीय मुलीचा लैगिंक छळ करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी संस्थाचालक डॉक्टर व काळजीवाहकाविरुद्ध अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. डॉ. अभिजित सेनगुप्ता व काळजीवाहक अनु राजन आर्चाय वय ३२ ,अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. प्रकरण दडपल्याने सेनगुप्ता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी तणावात राहायची. नोव्हेंबर २०२० मध्ये नातेवाइकांनी तिला सेनगुप्ता यांच्या लाइफस्कील्स केंद्रात दाखल केले. अनु हा पीडित मुलीचा लैगिंक छळ करायला लागला. त्याने चार वेळा मुलीचा लैगिंक छळ केला. ‘लग्न करून मी तुला पुण्यात शिकवायला पाठवेल’,असे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचारही केला. याबाबत कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. ही बाब माहिती असतानाही सेनगुप्ता यांनी ती दडपली.
दरम्यान, पीडित मुलीच्या नातेवाइकांना याबाबत कळाले. नातेवाइकाने कळमेश्वर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी काळजीवाहक व डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आचार्य याला अटक केली.
00000000000000