नागपूर : २२ एप्रिल – नागपुरात कोरोनाचा प्रकोप अविरत सुरु आहे. रुग्णसंख्या आणि रुग्णांचे रोज होणारे मृत्यू यातील काहीच कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. नागपूर शहरात रोज हजारोच्या संख्येने बाधित रुग्ण सापडत आहेत तर शेकडो रुग्णांचा मृत्यू होत आहे. नागपूर शहरात आज तब्बल ७५०३ नवीन बाधित रुग्ण आढळून आले तर १०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्य शासनाने लावलेल्या कडक निर्बंधांनंतरही कोरोना रुग्णवाढीत काहीच फरक पडलेला दिसत नाही. नागपूर शहरात गेल्या २४ तासात ७५०३ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून एकूण रुग्णसंख्या ३९३८०३ वर पोहोचली आहे. आजच्या रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील २६९० तर शहरातील ४८०३ आणि १० आहेत. आज १०२ रुग्णांच्या झालेल्या मृत्यूंमुळे जिल्ह्यातील एकूण मृतकांचा आकडा ७२२८ वर पोहोचला आहे. आजच्या मृत्यूंमध्ये ३८ ग्रामीण भागातील ५४ शहरातील तर १० इतर जिल्ह्यातील रुग्णांचे मृत्यू झाले आहेत.
नागपूर शहरात आज एकूण २६५२५ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यात ७२८३ ग्रामीण तर १९२४२ चाचण्या शहरात घेण्यात आल्या. सध्या शहरात ७७१८७ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यात ३०८३४ ग्रामीण भागात तर ४६३५३ शहरातील आहेत. गेल्या २४ तासात ६९३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३०९४१५ वर पोहोचली आहे. तर कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण ७८.६० आहे.