यवतमाळ : २७ एप्रिल – वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्या इंझाळा बिट मधील शेतात बिबट शिकार मिळविण्यासाठी आल्याची गावकर्यांच्या लक्षात आले. हा बिबट्या एखाद्या व्यक्तीवर हमला करेल या भितीने गावकर्यांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली. यावरून विनाविलंब वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल होवून येथिल परिस्थिती जाणून घेतली. तोच हा बिबट्या जखमी असल्याचे निदर्शनास आले. त्याला जेरबंद करण्यासाठी पांढरकवडा व पुसद येथिल वनविभागाच्या पथकाला प्राचारण करण्यात आले.
तोपर्यन्त गावकर्यांनीही तोबा गर्दी केली होती. त्याला पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचार्यांनी अथक परिश्रम घेवून प्रयत्न केले असता प्रथमच भुकेने व्याकूळ झालेल्या बिबट्याने एका वनरक्षकावरच झडप घातली सुदैवाने ती त्याची झडप होकुन तो पर्हाटीच्या ढीगात पडली व तिथेच तिने जीव सोडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत वनपरिक्षेत्र अधिकारी रंजीत जाधव यांना विचारले असता हा बिबट (छावा) १५ दिवसापासून जखमी असावा शिकारी दरम्यान रानटी डुक्करासोबत झटापट झाली असावी. त्याच्या पायाला गंभीर दुखापत झालेली होती. त्यामुळे तिला शिकार करता येणे शक्य नव्हते ती भुकेने व्याकूळ झालेली होती ती पूर्णत: अशक्त झालेली होती. तिला सोयस्कर शिकार करता यावी म्हणून ती शेताच्या दिशेने येवून शिकार शोधत असावी. अश्यातच तिला पकडण्यासाठी आम्ही तेथे गेलो असता तिने आमच्या एका कर्मचार्यावर छापा टाकण्याचा प्रयत्न केला यात ती अयशस्वी झाली.