दवाखान्याच्या नावावर अवैधरित्या आणलेले ६४ ऑक्सिजन सिलिंडर जप्त

वाशिम : २७ एप्रिल – वाशिम जिल्ह्यातील लकारंजा शहरात दवाखान्याच्या नावावर ट्रकमधून अवैधरित्या आणलेले ऑक्सिजनचे 64 सिलेंडर – स्थानिक गुन्हे शाखेने केले जप्त केले आहेत. व्यावसायिक वापरासाठी बंदी असताना ही हे जम्बो ऑक्सिजन सिलेंडर खरेदी केले होते. या सर्व जम्बो सिलिंडर पैकी 55 ऑक्सिजनने भरलेले तर 9 रिकामे सिलेंडर आहेत. या 55 सिलेंडर मध्ये जवळपास 1 मेट्रीक टन एवढा ऑक्सिजन भरलेला असल्यानं 4 हॉस्पिटलमध्ये किमान 4 तास हा ऑक्सीजन पुरू शकतो.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारंजा शहरातील हिंदुस्थान स्केप या कंपनीमध्ये एका ट्रक मधून दुसऱ्या ट्रकमध्ये हे जम्बो सिलेंडर टाकत असताना छापा टाकला. यामध्ये सिलेंडर आणि इतर असा 16 लाख 97 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत आहे. कोविड 19 चा संसर्ग वाढल्याने संपूर्ण देशात ऑक्सिजन अभावी बरेच लोकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत.
विस्तारा एअरलाइन्सची मोठी घोषणा; डॉक्टर, नर्सेसना देशभर मोफत प्रवासाची सुविधा
त्या संदर्भाने वाशिम पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कारंजा भागात गुन्हेगारी वाँच पेट्रोलिंग करीत असतानाच कारंजा ते नागपूर महा मार्गावरील यशोतिरथ कॉलनी, महाराष्ट्रनगर मधील हिंदुस्थान स्केप या ठिकाणी संशयितरित्या बोलेरो पिकअप मधून एका ट्रकमध्ये ऑक्सिजनचे सिलेंडर भरत असल्याचं दिसले. त्या ठिकाणी पाहणी केली असता पिक अप क्रमांक एम एच 29 एटी 0818 या वाहनातून ट्रक क्रमांक एमएच 21 – 6001 मध्ये काही इसम ऑक्सिजन सिलेंडर भरताना आढळून आले.
संशयावरुन सदर सिलेंडरची अधिक माहती घेतली असता पिकअपमध्ये एकूण 29 ऑक्सिजन सिलेंडर व ट्रकमध्ये एकूण 26 ऑक्सिजन सिलेंडर तसेच न्यु हिंदुस्थान एजेंसी दुकानात जमिनीवर एकूण 09 रिकामे सिलेंडर आढळुन आलेत. याबाबत दुकानाचे मालक रियाज अहमद गुलाम रसुल वाशिम याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर व्यवसायाचे लायसन्स असल्याचे सांगितले. तसंच त्यांच्याकडे सदर सिलेंडर कोठुन खरेदी केले याबाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचे सिलेंडर हे AMOHAOXY INDUSTRIAL GASES PVT.LTD नागुपर येथून खरेदी केल्याचे सांगितले.

Leave a Reply