कोरोना संदर्भातील कोणत्याही मदतीसाठी संपर्क साधण्याचे नितीन गडकरींचे विदर्भातील जनतेला आवाहन

नागपूर : २६ एप्रिल – कोविडची परिस्थिती गंभीर होताना आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहे. या परिस्थितीत नागपूरसह अनेक भागांसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वाचे पाऊल उचलले आहे. ऑक्सिजन पुरवठा, अद्यावत मेडिकल सोयी सुविधा, व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करून देणे. यात आता विदर्भातील जनतेला मदतीची गरज असल्यास नितीन गडकरी यांच्या कार्यलयाला संपर्क करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भातील नगरपरिषद व तालुकास्तरावर ज्या सरकारी, गैर सरकारी ट्रस्टद्वारे संचालित रुग्णालयांना ऑक्सिजन सिलेंडर, ऑक्सिजन कॅान्संट्रेटर, व्हेंटिलेटरची अत्यंत तातडीची आवश्यकता आहे त्यांनी माझ्या नागपूर कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. यामुळे काही प्रमाणात का होईना विदर्भातील जनतेला दिलासा मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे.

Leave a Reply