नागपूर : २४ एप्रिल – नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्यामार्फ त नागपूर जिल्हा व शहरातील विविध रस्ते, पूल आणि वळणमार्ग बांधणीसाठी घसघशीत निधी मंजूर करण्यात आला आहे.
नागपूर शहरातील कळमना वळणमार्गावरील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने रस्ता बांधकामासाठी ४.४० कोटी, वळणमार्गावरील छोट्या पुलांच्या बांधकामासाठी ४ कोटी, हिंगणा मार्गावरील सीआरपीएफ प्रवेशद्वार-लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन-रायसोनी महाविद्यालय-लता मंगेशकर हॉस्पिटल-शिवनगाव रस्त्याच्या कामासाठी २४.७९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात काटोलमधील सरकारी विश्रामगृह ते मटण मार्केट रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. कु ही तालुक्यातील वागड-विरखंडी-तारणा रस्त्यावर पुलाच्या बांधकामासाठी ११.०२कोटी, नरखेड तालुक्यातील थाठुरवाडा-भिष्णूर, तीनखेडा, खरसोली नरखेड-मोहदी दळवी रस्त्यासाठी ९५ कोटी, रामटेक तालुक्यातील छतरपूर बोर्डा-एरोली दरम्यानच्या रस्त्यासाठी व पुलाच्या बांधकामासाठी ९५ कोटी, उमरेड तालुक्यातील बेला भागातील रस्त्यांसाठी २४.७८ कोटी, नरसाळा ते पाणगावपर्यंत रस्ता बांधणीसाठी ११.८ कोटी, नरखेड तालुक्यातील खरसोली येथे पुलाच्या बांधकामासाठी २ कोटी,रुपये मंजूर करण्यात आले आहेत.