टिव्ही रिमोट सोडा, देश जोडा – अभिनेता सोनू सूदचा चाहत्यांना सल्ला

मुंबई : २२ एप्रिल – देशभरात सध्या कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. दिवसेन् दिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. अभिनेता सोनू सूद जो या कठीण काळात लोकांची गेल्या वर्षभरापासून मदत करत होता त्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. पण तरीही सोनूचं मदतकार्य सुरूच आहे. नुकतच सोनूने एक नव ट्विट केलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.
ट्विट मध्ये त्याने लिहिलं आहे, ‘टिव्ही रिमोट सोडा, देश जोडा. दुसऱ्यांचे प्राण वाचवाल तरच जगू शकाल’. सध्या लॉकडाउन सुरू असल्याने लोक घरातच आहेत व दिवसरात्र टिव्ही, बातम्या पाहत आहेत. तर याशिवाय दुसरा काही पर्याय देखिल नाही. त्यामुळे सोनूने चाहत्यांना हा सल्ला दिला आहे.
देशभरात कोरोनाच्या संकटाने हाहाकार माजवला असताना लोकांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे. काही लोक मदत करण्यासाठी पुढे तर आहेत तर काहीजन घाबरून घरातच बसण पसंत करत आहेत. तर काही कडक निर्बंधामुळे बाहेर घरातच राहण पसंत करत आहेत. त्यामुळे सोनूने हा सल्ला दिला आहे.
सोनू कोरोना संक्रमित झाला असला तरीही त्याचं मदत कार्य सुरूच आहे. ‘सोनू सूद फाउंडेशन’ तर्फे त्याचं हे कार्य सुरू आहे. त्याच्या ट्विटर अकाउंट वरून तो याची माहिती देत असतो. याशिवाय सोनूने अँटी कोरोना व्हॅक्सिन घेण्याची मोहीम सुरू केली आहे.

Leave a Reply