कोरोनाग्रस्तांचे मृतदेह दोन दिवस चादरीतच झाकून ठेवले – वाशीम मधील हॉस्पिटलमधला प्रकार उघड

वाशिम : २२ एप्रिल – कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह दोन दिवस बेडशीटमध्ये झाकून ठेवला जात आहे. वाशिम लेडी हार्डिंग कोव्हिड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे इतर रुग्णांची तब्येतही बिघडत असल्याचा आरोप केला जात आहे.
कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याबाबत काही नियम आहेत. मात्र दोन दिवस आधी मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाला बेडशीटमध्ये झाकून ठेवलं जात असल्याचा गंभीर प्रकार घडत आहे. वाशिम लेडी हार्डिंग कोविड रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
रुग्णालय प्रशासनाच्या या हलगर्जीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या इतर रुग्णांच्या तब्येतीतही बिघडत असल्याच्या आरोप रुग्णांच्या नातेवाईकांमधून होत आहे.

Leave a Reply