नागपुरात १६ मेट्रिक टन ऑक्सिजनची पहिली खेप पोहोचली

नागपूर : २० एप्रिल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे भिलाई स्टील प्लांट येथून १६ मेट्रिक टन ऑक्सिजनची पहिली खेप नागपुरात पोहोचल्याने नागपुरातील रुग्णांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. रुग्णांच्या नातेवाईकांच्या चेहर्यावर आनंद झळकू लागला आहे. ३६ मेट्रिक टन ऑक्सिजनची दुसरी खेप मध्यरात्री पोहोचणार आहे. त्यामुळे नागपुरात आता ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावणार नाही. सोबतच त्यांनी सीएसआर फंडमधून ‘स्पाईस हेल्थ’कडून मागविलेल्या 125 नॅान-इनव्हॅसिव्ह व्हेंटिलेटरचे वितरणही आज नागपुरातील १२ रुग्णालयांना करण्यात आले. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी कृतज्ञता व्यक्त केली.
नागपुरात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि फॅविपिराविर औषधांचा तुटवडा आहे. सोबतच खाटा मिळत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. कोरोनाच्या नव्याने आलेल्या लाटेमध्ये तरुण मुले दगावण्याची सरासरी अधिक आहे. कालच पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे शालिनीताई मेघे रुग्णालयाने ऑक्सिजनसाठी साकडे घातले. काँग्रेसचे मंत्री रुग्णसेवा पुरविण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. केवळ बैठका घेऊन घोषणांचा पाऊस पाडत आहेत. मात्र, प्रत्यक्षात अंमल होताना दिसत नाही.
परंतु, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याहून वेगळे आहेत. जे बोलतात ते करून दाखवितात. काही दिवसांपूर्वी त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शन पुरविण्यासाठी औषध निर्मात्या कंपन्यांनाही गळ घातली होती. वर्धेतील डॉ. श्रीरसागर यांच्या कंपनीला त्यांनी रेमडेसिविर उत्पादनाचे परवानेही तत्परतेने मिळवून दिले. आता ऑक्सिजन मिळवून देण्याचे त्यांचे प्रयत्नही फळास आले आहेत.
भिलाई स्टील प्लांटमधून 16 मेट्रिक टन ऑक्सिजनची पहिली खेप नागपुरात पोहोचली आहे. 36 मेट्रिक टन ऑक्सिजनची दुसरी खेप, भिलाई स्टील प्लांट आणि बेल्लारी येथून आज मध्यरात्री येणार आहे. त्यामुळे आता नागपुरात ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही. ऑक्सिजन अभावी कुणाला प्राण गमवावे लागणार नाही. या ऑक्सिजनचे वितरण जिल्हाधिकार्यांमार्फत रुग्णालयांना केले जाणार आहे.
नितीन गडकरींनी सीएसआर फंडमधून ‘स्पाईस हेल्थ’कडून 125 नॅान-इनव्हॅसिव्ह व्हेंटिलेटर मागवले होते, ते व्हेंटिलेटर्स आज त्यांनी नागपूरमधील 12 रुग्णालयांना वितरीत केले. सौम्य आणि मध्यम प्रकारचा श्वसनाचा त्रास असेलेल्या रुग्णांना यामुळे फायदा होईल. दरम्यान, इंजेक्शनसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रुग्णांचे नातेवाईकांची गर्दी करीत आहेत. कुणाचा अश्रुंचा बांध फुटत आहे. गडकरींनी ऑक्सिजनचा साठा उपलब्ध करून दिल्याने रुग्णांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी आता रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी आर्त हाक रुग्णांचे नातेवाईक मारत आहेत.

Leave a Reply