४५ लाखांची बॅग घेऊन फरार झालेल्या मुख्य आरोपीला राजस्थानातून अटक


चंद्रपूर : १७ एप्रिल – येथील निळापूर रस्त्यावर ४५ लाखांची बॅग घेऊन फरार झालेल्या मुख्य आरोपीला राजस्थानातून पोलिसांनी अटक केली आहे २० मार्च रोजी आनंद अग्रवाल यांच्या इंदिरा एग्झिम जिनिंगचे अधीक्षक मनीष जंगले दुचाकीवर बसून ४५ लाख रुपये बँकेतून घेऊन येत होते. अहफाज कॉटन जीनजवळ दुपारी ३. ३० च्या दरम्यान एका पांढर्‍या रंगाच्या कारने त्याच्या दुचाकीला धडक देऊन मनीष जंगलेला खाली पाडले. कारमधील व्यक्तीने त्याचे तोंड दाबले व दुसर्‍या व्यक्तीने बॅग हिसकावून ४५ लाख रुपये घेऊन कारने पसार झाले होते.
या घटनेत मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला असून अन्य तीन आरोपी फरार आहेत. या घटनेतील मुख्य आरोपी बाबूलाल बिश्नोई ३६ याला लोहावत गावातून अटक केली आहे. बाबूलाल हा मागील १५ ते 1६ वर्षांपासून येथील जिनिंगमध्ये कामगार पुरवण्याचे काम करीत होता. यवतमाळचे सहपोलिस निरीक्षक गजानन करवडे यांच्या नेतृत्वात एक पथक राजस्थान येथील जोधपूर जिल्ह्यात पाठविण्यात आले. मुख्य आरोपीला अटक केल्यामुळे इतर फरार आरोपींना लवकरच अटक करण्यात यश येईल आहे. असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. या आरोपीला अटक करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, अपर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय पोलिस अधीक्षक संजय पुजलवार, वणी ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक गजानन करवडे, डीबीप्रमुख उपनिरीक्षक गोपाळ जाधव, गजानन डोंगरे, उल्हास कुरकुटे यांनी कारवाई पार पाडली.
000000000000000000000

Leave a Reply