लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने केला महिला पोलिस अधिका-यावर लैंगिक अत्याचार


मुंबई : १७ एप्रिल – लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्या प्रकरणी महिला पोलीस अधिकाऱ्याने पुरुष पोलीस अधिकाऱ्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. मुंबईतील डोंगरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून पोलीस अधिकाऱ्याने तक्रारदार महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने पीडित महिला पोलीस अधिकाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा दुष्कर्म केले. जेव्हा पीडितेने लग्नाची विचारणा केली. तेव्हा त्याने उघडपणे नकार दिलाण् एवढंच नव्हे तर आरोपीच्या घरातील दोघा जणांविरुद्ध पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
महिलेच्या तक्रारीनुसार डोंगरी पोलिसांनी संबंधित पोलिस अधिकाऱ्याविरोधात कलम ३७६ ए ३७६ / 2 ;एन३५४;बीद्धए 377ए 420ए 323ए 504ए 506 तसेच अ‍ॅट्रॉसिटी अक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणी काल गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. लवकरच पोलिस आरोपीचाही जबाब नोंदवतील आरोपी मुंबईतील एका पोलिस ठाण्यात तैनात आहे
इन्स्टाग्रामद्वारे महिलेशी ओळख करुन तिला पोलीस भरती आणि लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार गेल्याच महिन्यात घडला होता. आरोपीने आपण पोलीस असल्याचं सांगत या महिलेला पोलीस भरतीचं आमिष दाखवलं तिच्याशी शारीरिक संबंध जोडले तसंच लग्नाचं आमिष दाखवत मारहाण केल्याची तक्रार पीडित महिलेकडून करण्यात आली होती. या महिलेच्या तक्रारीवरुन अहमदनगरमधील राहता पोलिस ठाण्यात तोतया पोलिसाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबईतील सार्वजनिक बांधकाम अभियंत्याविरोधात बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिला पोलिसाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उघडकीस आली होती ४७ वर्षीय महिला पोलीस हवालदाराने पिंपरी चिंचवडमध्ये आयुष्य संपवलं होतं मृत्यूच्या पंधरा दिवस आधी संबंधित महिलेने वरळी पोलिसात बलात्काराची तक्रार नोंदवली होती-
0000000000000000

Leave a Reply