क्षुल्लक वादातून एकाचा खुन, एका तासात आरोपीला अटक

अमरावती: १७ एप्रिल : चांदूर रेल्वे  शहरातील खडकपुरा येथील घराशेजारी राहणार्‍या दोन इसमाचा केबल सारख्या क्षुल्लक कारणावरुन वाद होऊन यात एकाचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. घटनेच्या केवळ एका तासानंतरच पोलिसांनी आरोपीला अटक केली आरोपीला 18 एप्रिलपर्यंत पीसीआर सुनावण्यात आला आहे. सुखदेवराव मारोतराव लुटे ;वय ४५ वर्ष असे मृतकाचे नाव आहे. प्राप्त  माहितीनुसार,  चांदूर रेल्वे शहरातील खडकपुरा येथे सुखदेव लुटे व राजेश मोहतुरे हे एकमेकाच्या घराशेजारी राहतात. त्यांचा अनेक दिवसापासून क्षुल्लक . क्षुल्लक कारणावरून वाद होत होते. अशातच माझ्या घरासमोरून केबल का टाकला असा वाद उद्भवला. शुक्रवारी सकाळी दोघांचे भांडण झाले. आरोपी राजेश मोहतुरे याने लोखंडी सलाखीने सुखदेव लुटे यांच्यावर वार केला. यात लुटे यांचा जागीच मृत्यु झाला. खून झाल्याची माहिती चांदूर रेल्वे पोलिस स्टेशनला देण्यात आली. ठाणेदार मगन मेहते यांनी एपीआय गिता तांगडे, कर्मचारी जगदिश राठोड, संदीप शिरसाट, एएसआय ढोले यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व घटनेच्या केवळ एका तासानंतर आरोपी राजेशला अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.  
खडकपुरा येथे अनेक दिवसांपासून सुखदेव लुटे हे राहत होते. त्यांना पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. रामनवमी  च्या दिवशी त्यांच्या मुलीचा लग्न सोहळा सुद्धा आयोजित केला आहे. त्यांच्या मुलीच्या लग्नपत्रिका वाटणे सुरू आहे. अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे असलेले सुखदेवराव हे हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या खुनाची बातमी नागरिकांना कळताच अनेक लोकांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली व हळहळ व्यक्त केली.

Leave a Reply