नागपूर : १७ एप्रिल -राज्यात कोरोनाने हैदोस घातला आहे. यातच नागपुरातही बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. राज्यात १५ दिवसांची संचारबंदीही लावण्यात आली आहे. मात्र तरीही कोरोनावर आळा बसलेला नाही. संचारबंदी असतानाही बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. अशाच विनाकारण फिरणाऱ्यांविरोधात नागपूर पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहे. पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांची आता रस्त्यावरच रॅपिड अँटिजन चाचणी करणे सुरू केली आहे.
यामध्ये पॉझिटिव्ह आलेल्यांची लगेच विलगीकरन केंद्रात रवानगी करण्यात येत आहे. यामध्ये सुरुवातीच्या तीन पैकी दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले या पॉझिटिव्ह आलेल्या लोकांची इन्स्टिट्यूशनल विलगीकरन केंद्रात रवानगी करण्यात आली आहे. पोलिसांचा या कारवाईमुळे आता तरी काम नसताना रस्त्यावर फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांच्या वागण्याला आळा बसते का हे पाहणे महत्त्वाचे आहे.