अमेरिकेने कच्च्या मालावरील हे निर्बंध उठवावे- अदर पुनावाला यांची जो बायडन यांना विनंतीमुंबई : १७ एप्रिल – भारतात कोरोनाने पुन्हा थैमान घालण्यास सुरुवात केली राज्यासह देशभरात कोरोना रुग्णांची वाढती संख्या हे चिंतेच कारण ठरलं आहे. कोरोनाला थोपवायचं असेल तर लसीकरण हाच त्याच्यावरील महत्त्वाचा उपाय आहे. राज्यासह देशभरात कोरोना प्रतिबंधक लसींचं मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे मात्रए महाराष्ट्रासह देशासाठी चिंता वाढवणारी एक बातमी समोर आलीय कोरोना लसींसाठी लागणारा कच्चा माल अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी रोखून धरला आहे. अमेरिकेने कच्च्या मालावरील हे निर्बंध उठवावे अशी विनंती सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ट्विटरवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना टॅग करुन केली आहे .
आदरणीय जो बायडन सर कोरोना विरोधाच्या या लढाईत आपण खरंच एकत्र लढत असू तर माझी कळकळीची एक नम्र विनंती आहे. कोरोना लसीसाठी लागणारा कच्चा माल अमेरिकेत रोखून ठेवण्यात आला आहे. कृपया कच्च्या मालावरील हे निर्बंध तातडीने हटवाए जेणेकरुन लसीचे उत्पादन वाढवता येईल असं अदर पुनावाला ट्विटरवर म्हणाले आहेत. मात्र त्यावर अद्याप बायडन यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
अदर पुनावाला यांनी चार दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत लसीच्या उत्पादनावरुन चिंता व्यक्त केली होती लसीसाठी आवश्यक असलेला कच्चा माल अमेरिका आणि युरोपातील काही देशांनी रोखून धरला आहे. हाच सर्वात मोठा अडथळा आहे. ज्यामुळे उत्पादन वाढवणं आव्हान होऊन बसलं आहे. आम्हाला आताच कच्च्या मालाची सर्वात जास्त गरज आहे. ज्यामुळे भारत आणि जगाच्याही लसीची गरज पूर्ण होऊ शकते असं पुनावाला यांनी सांगितलं होतं
००० ००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

Leave a Reply