चोरटी दारू विकणाऱ्यांवर धाड टाकून ४३ लाखाचा मुद्देमाल केला जप्त

यवतमाळ : १६ एप्रिल – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ब्रेक द चेन या सेकंद लॉकडाऊनमध्ये जिल्हात दारू विक्री बंदचा आदेश असताना, चोरट्या पध्दतीने दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मिळताच त्याच्या पथकाने रात्री ९ वाजता दरम्यान तालुक्यातील मार्डी येथील एका देशी विदेशी दारू दुकानावर धाड टाकून ४३ लाखांच्यावर मुद्देमाल जप्त करण्यात आले.
मार्डी येथे चोरट्या पद्धतीने दारू विक्री होत असल्याची गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधिक्षकांना मिळताच यांचे पथकांनी काल रात्री ९ वाजते दरम्यान जयस्वाल यांचे दारू दुकानावर धाड टाकुन यात देशी विदेशी दारूच्या पेट्या सह नगदी रोख रक्कम असे एकूण ४३ लाखांच्यावर मुद्देमाल जप्त केला आहे. यात एका विधी संघर्ष बालकासह काही आरोपी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ व पो.नि.प्रदीप परदेशी यांचे मार्गदर्शनात सायबर सेल व एलसीबी पथकाचे पो.नि.किशोर जुंनघरे, स.पो.नि.अमोल पुरी, पोउपनी योगेश रंधे, पो.ना.कविष पालेकर, बबलू चव्हाण, उमेश पिसाळकर, पंकज पातूरकर, पो.कॉ. सुधीर पिदूरकर, सलमान शेख, शहजाद शेख यांनी केली.

Leave a Reply